Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Crime News : उज्जैनला जातो सांगून 1200 किमी प्रवास केला अन्... माजी केंद्रीय मंत्र्याच्या पुतण्याचा सापडला मृतदेह

Crime News : हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दोघांनीही मृत्यूपूर्वी एका दुकानातून दोरी घेतल्याचे एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. मात्र चंद्रपुरातील दोघेही चंदीगड येथे जाऊन आत्महत्या का करतील असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

Crime News : उज्जैनला जातो सांगून 1200 किमी प्रवास केला अन्... माजी केंद्रीय मंत्र्याच्या पुतण्याचा सापडला मृतदेह

Crime News : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि  मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (Hansraj Ahir) यांच्या पुतण्याचा मृतदेह पंजाबची राजधानी चंदीगड (Chandigarh) येथे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हंसराज अहीर यांचे बंधू हरिशचंद्र अहीर यांचा मुलगा महेश अहीर (Mahesh Ahir) आणि त्याचा मित्र हरीश धोटे यांचे मृतदेह चंदीगड येथील कजेहडी गावाजवळील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे चंदीगडसह महाराष्ट्रातही खळबळ उडाली आहे. दरम्यान दोघांनीही आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली अशी चर्चा सुरु झाली आहे.

महेश आणि हरीश या दोघांचेही मृतदेह गुरुवारी रात्री उशिरा चंद्रपूरला (Chandrapur) आणले जाण्याची शक्यता आहे. महेश अहीर आणि त्याचा मित्र हरीश धोटे आठवड्याभरापूर्वीच चंदीगड येथे गेले होते. तेव्हापासून 28 वर्षीय हरीश आणि त्याचा मित्राचा कोणाशीही संपर्क झाला नव्हता. दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही संपर्क होऊ शकला नव्हता. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी 15 मार्च रोजी चंद्रपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.

या प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी एक पथक चंदीगडला पाठवले. मात्र बुधवारी संध्याकाळी महेश अहिर आणि हरीश धोटे यांचे मृतदेह चंदीगडमध्ये कजेहडी गावाजवळील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर चंदीगड पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. चंद्रपूरला ही माहिती पोहोचल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर महेश आणि हरीशचे नातेवाईक दोघांचे मृतदेह आणण्यासाठी चंदीगडला रवाना झाले.

अंगावर कोणत्याही जखमा नाहीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने याबाबत माहिती दिली. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास चंदीगड येथील सेक्टर 52 मधील जंगलात दोन तरुणांचे झाडाला लटकलेले मृतदेह या व्यक्तीला दिसले होते. त्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली. "पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही सेक्टर-16 मधील शासकीय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोघांच्याही मृतदेहावर कोणत्याही बाह्य जखमांच्या खुणा आढळ्या नाहीत. आम्ही या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी करत आहोत," अशी माहिती दक्षिण-पश्चिम विभागाचे पोलीस उपअधीक्षक चरणजीत सिंह विर्क यांनी दिली.

दरम्यान, चंदीगड पोलिसांनी या प्रकरणी भादविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु केली आहे. सेक्टर 43 मधील आंतरराज्य बस टर्मिनलजवळील दुकानातून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेजण दोरी खरेदी करताना दिसले असल्याचीही माहिती पोलीस उपअधीक्षक विर्क यांनी दिली.

उज्जैनला जातो सांगितले अन्...

माध्यमांच्या वृत्तानुसार दोघेही 14 मार्च रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन (Ujjain) येथे जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते. मात्र ते दोघेही उज्जैनला पोहोचले नसल्याने त्यांच्या मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही. यानंतर कुटुंबीयांनी 15 मार्च रोजी चंद्रपूर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

Read More