Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

हे कशाचे परिणाम! 14 वर्षांच्या मुलाचा 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, उरणमधील धक्कादायक घटना

रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये अल्पवयीन मुलाकडून चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना, सोशल मीडियाच्या अतिवापराचा अल्पवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम

हे कशाचे परिणाम! 14 वर्षांच्या मुलाचा 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, उरणमधील धक्कादायक घटना

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातल्या उरणमधून (Uran) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या  5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याचे उघड झालंय. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यावर आईने उरण पोलीस ठाणे गाठत आरोपी मुलाविरोधात तक्रार दाखल केली. आरोपी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं असून उरण पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे मात्र उरण परिसरात एकच खळबळ उडालेय

सोशल मीडियाच्या अतिवापराचा अल्पवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुलांच्या हातात मोबाईल आल्यापासून व्हॉटसअप (whatsapp ) फेसबुक (facebook), इंस्टाग्राम(instagram), यावर अल्पवयीन मुलं (TeenAgers)खूप वेळ घालवू लागली आहेत. 

Read More