Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जळगावात दोन दिवस तर इंदापूर येथे नऊ दिवस जनता कर्फ्यू जाहीर

अनलॉकिंग सुरू असताना आता राज्यातली छोटी छोटी शहरे पुन्हा लॉकडाऊन होऊ लागली आहेत. जळगाव शहरात दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये नऊ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. 

जळगावात दोन दिवस तर इंदापूर येथे नऊ दिवस जनता कर्फ्यू जाहीर

जळगाव : अनलॉकिंग सुरू असताना आता राज्यातली छोटी छोटी शहरे पुन्हा लॉकडाऊन होऊ लागली आहेत. जळगाव शहरात दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये नऊ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. 

जळगाव शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होतेय. अनलॉकिंग झाल्यानंतर त्यामध्ये आणखी वाढ झाली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज आणि उद्या जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. दुसरीकडं इंदापूरसारख्या शहरातही कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव शहरात शनिवार आणि रविवार हे दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला आहे. यापूर्वीही प्रशासनाने याबाबतचे आदेश दिले असताना मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर जिल्ह्यात दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत असल्याने आता व्यवसायिकांनी स्वतःहून पुढाकार घेत शनिवार-रविवार ही दोन दिवस दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

अनलॉक झाल्यानंतर बाजारपेठा खुल्या झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना साखळी दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी प्रशासनाच्यावतीने शनिवार आणि रविवार हे दोन दिवस संपूर्ण दुकाने मार्केट आणि इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत सर्रासपणे बाजारपेठ उघड्या होत्या. 

प्रशासनाच्यावतीने इंदापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी घरोघरी जाऊन केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे आज इंदापूर शहरात आले असता त्यांनी स्वतः इंदापूर शहरातील नागरिकांच्या घरी जाऊन त्यांनी स्वतः नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. याचबरोबर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि पुणे  जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसास यांनीही शहरातील नागरिकांच्या घरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. इंदापूर शहरात आज दिवसभरात साडेपाच हजार कुटुंबांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा  यांनी सांगितले आहे.  

Read More