Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीला सुरवात; राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिष्ठा पणाला

निवडणूकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह तीन आमदार रिंगणात

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीला सुरवात; राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिष्ठा पणाला

अनिरुद्ध दवाळे, झी मराठी, अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचे मतदान काल पार पडले या निवडणुकीत १६८७ पैकी १५७९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर २१ जागेसाठी ही निवडणूक होती या मध्ये चार जण अवरोधित निवडून आले त्यामुळे १७ जागेसाठी निवडणूक पार पडली. यात ४८ उमेदवार निवडनुक रिंगणात होते तर सकाळी ८ वाजता पासून मतमोजणी सुरवात झाली असुन सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनल मध्ये लढत झाली. 

निवडणूकीत महाविकास आघाडी सरकार मधील यशोमती ठाकूर व बच्चू कडू आमने सामने होते तर राज्यमंत्री बच्चू कडू सह तीन आमदार निवडणूक रिंगणात उभे असलेल्याने निवडणूकीत दिगग्जांची प्रतिष्ठा पणाला लागली होती दुपारी १ वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर याच सहकार पॅनल बाजी मारते की राज्यमंत्री बच्चू कडू याच परिवर्तन पॅनल बाजी मारणार हे पाहणे औतुक्याच ठरेल.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत असून या करीत जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. काल सकाळी 8 वाजल्या पासून या मतदानाला जिल्ह्यात सुरुवात झाली. सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी अटीतटीची हि निवडणूक होणार आहे सकाळी ८ वाजल्या पासून मतदानाला सुरुवात होणार आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७ जागांसाठी  हे मतदान होत आहे. या निवडणुकीत १४ तालुक्यांमधून १६८७ मतदान करून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र आहेत. चार जागांवर चार संचालकांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. 

निवडणूकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह तीन आमदार रिंगणात

या निवडणुकीत प्रथमच राज्यमंत्री बच्चू कडू सह तीन विद्यमान आमदार निवडून रिंगणात असल्याने हि निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून अमरावती जिल्हा सह राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहेत तसेच या निवडणुकीत काँग्रेस नेत्या व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू यांच वेगळे वेगळे पॅनल असल्याने बच्चू कडू व यशोमती ठाकूर या दोन महाविकास आघाडी मधील मंत्र्याचे भवितव्य पणाला लागले आहे. 

Read More