Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'को एक्झिस्टींग विथ कोरोना' योजनेची अमोल कोल्हेंची सूचना

काय आहे 'को एक्झिस्टींग विथ कोरोना' प्लान? 

'को एक्झिस्टींग विथ कोरोना' योजनेची अमोल कोल्हेंची सूचना

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र अद्यापही कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला सल्ला दिला. यामध्ये त्यांनी 'को एक्झिस्टींग विथ कोरोना' असा प्लान केंद्राने तयार करावा अशी सूचना केलेली आहे. 

लॉकडाऊन दीर्घकाळ पर्यंत थांबवणं आपल्या अर्थव्यवस्थेला, उद्योगांना, कामगार, नोकरदार आणि सर्वसामान्य जनता यापैकी कुणालाच परवडणारं नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण टीबी, मलेरिया, H 1 N 1 अशा आजारांसह दैनंदिन आयुष्य जगतोय त्याच धर्तीवर 'को एक्झिस्टींग विथ कोरोना' असा प्लान केंद्र सरकारने तयार करावा अशी सूचना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पथकासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत केली.

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पथक निर्माण करण्यात आलं. या पथकाने पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील खासदार, आमदार आदींसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक घेतली. या बैठकीत डॉ. कोल्हे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून अनेक महत्त्वाच्या बाबींकडे या पथकाचे लक्ष वेधले. 

या चर्चेत त्यांनी आपण लॉकडाऊन केलं आहे. मात्र मास टेस्टिंग करत नसल्याचा विसंगती लक्षात आणून दिली आणि मास टेस्टिंगची मागणी केली आहे. तसेच 'को एक्झिस्टींग विथ कोरोना' प्लान तयार करून प्रथम ग्रीन झोन मध्ये त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ऑरेंज आणि रेड झोनमध्ये हा प्लान राबवावा असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय उपचार करणाऱ्या स्टाफची इंटरव्हलला नियमित तपासणी करण्यात यावी. उपचार करणारी रुग्णालये कोरोना संसर्गाची केंद्रीय बनणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून डॉ. कोल्हे यांनी "टायफाईड मेरी" या बहुचर्चित घटनेप्रमाणे घडू नये अशी अपेक्षा व्यक्त करताना इटली सारख्या देशात एकाच वेळी अनेक रुग्णांलयात कोरोना रुग्णावर उपचार केले. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊन परिस्थिती अधिक गंभीर बनली याकडे केंद्रीय पथकाचे लक्ष वेधून सर्वण कोविड रुग्णालयात एकाच वेळी रुग्ण दाखल करून उपचार करण्याऐवजी एका रुग्णालयाची खाटांची क्षमता संपेपर्यंत दुसऱ्या रुग्यालयात दाखल कोरोनाचा रुग्ण दाखल करू नये अशी सूचनाही डॉ. कोल्हे यांनी केली.

Read More