Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पोलिसांची नजर चुकवली आणि जीवावर बेतलं, तीन पर्यटक बुडाले

अतिशहाणपणा मुंबईच्या 3 तरुणांना भोवला...प्रशासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवली पण तेच जीवावर बेतलं... तुम्ही अशी चूक करू नका

पोलिसांची नजर चुकवली आणि जीवावर बेतलं, तीन पर्यटक बुडाले

प्रफुल्ल पवार झी मीडिया अलिबाग: मुंबईसह राज्यात कोरोनामुळे सध्या तरी पर्यटनावर बंदी आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून होत आहे. तरीही मुंबईच्या तीन तरुणांनी सर्व नियमांना बगल देऊन शहाणपणा केला. त्यांचं हे धाडसं त्यांच्या कधी जीवावर बेतलं हे त्यांनाही कळलं नाही. ही धक्कादायक घटना कर्जतच्‍या पालीभुतिवली परिसरात घडली.

 बंदी असतानाही कर्जतच्‍या डिकसळ येथील पालीभुतिवली धरणावर मुंबईचे तीन तरुण पोलिसांची नजर चुकवून फिरायला गेले. त्याच वेळी हे अतिधाडस अंगाशी आलं आणि तीन पर्यटक धरणात बुडाले. नेरळ पोलीस स्‍थानिकांच्‍या मदतीने या तिघांचा शोध घेत आहेत. हे सर्वजण मुंबईतील कुर्ला नौपाडा परीसरातील रहिवासी आहेत.

हे तरूण आपल्‍या मित्रांसमवेत इथं पावसाळी सहलीचा आनंद घ्‍यायला गेले होते. कर्जत खालापूर तालुक्‍यातील धबधबे आणि धरणांवर पावसाळयात फिरायला बंदी आहे. तसे आदेश कर्जतच्‍या प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी काढले होते. तरीदेखील बंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हे तरुण धाडस करून गेले. 

पोलिसांची नजर चुकवून धरणात गेल्यानंतर तिघे बुडाले. या घटनेची माहिती नेरळ पोलीस घटनास्‍थळी पोहोचले असून त्‍यांनी स्‍थानिकांच्‍या मदतीने बचाव कार्य सुरू केले आहे. तर खोपोली येथून अपघातग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी संस्‍थेचे बचाव पथकदेखील घटनास्‍थळाकडे रवाना झाले आहे. दोन वर्षांपूर्वी याच धरणात दोघा पर्यटकांचा बुडून मृत्‍यू झाला होता. 

Read More