Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचा धोका, पाहा काय म्हणाले राजेश टोपे

 Coronavirus in Maharashtra :राज्यात कोरोनाचा धोका टळलेला नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचा धोका, पाहा काय म्हणाले राजेश टोपे

मुंबई : Coronavirus in Maharashtra :राज्यात कोरोनाचा धोका टळलेला नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका हा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आहे. कोविड  नियंमांचे पालन करायला पाहिजे. केंद्राच्या सूचनेद्वारे आपण सगळे नियम पाळत असतो, मात्र, हे सगळे किती लांबवायचे हे आपल्या हातात आहे, असे आरोग्य राजेश टोपे यांनी म्हटले आहे. (Coronavirus - third wave threat in the third week of October - Rajesh Tope)

कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोविडची तिसरी लाट राज्यात आलेली आहे असे मी म्हणणार नाही, टेस्टींग खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. पॉझिटीव्हीटी रेट कमी आहे. जगात बघितलं तर तिसरी लाट आलेली आहे, पण ही तिसरी लाट सौम्य आहे, असे आरोग्यमत्री टोपे म्हणाले

गणपती सुरु आहे. दसरा दिवाळी आहे. सण-वार सुरु आहेत. लोकांचे म्हणणं होतं शिथिलता कमी करा, ती कमी केलेली आहे. परंतु टेस्टींग कमी केलेले नाही. यावर लसीकरण हाच पर्याय आहे. आपण 7 कोटी डोस दिलेले आहेत. 55 टक्के पहिले डोस झालेत, 25 टक्के दुसरे डोस झाले आहेत, अशी माहिती टोपे यांनी यावेळी दिली. 

लसीकरणाची गती वाढली तर चांगलं होईल. प्रतिकारशक्ती वाढवण्याची देखील गरज आहे. यावर आता व्हॅक्सिनेशन हा उपाय आहे. लसीकरण घेतलं असलं तर संसर्ग झाला तरी जास्त फटका बसणार नाही, असे ते म्हणाले. आपण केंद्राच्या सूचनेद्वारे आपण सगळे नियम पाळत आहोत. त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे. काळजी घेतली नाही तर हे किती दिवस लांबवायचे हे तुमच्या हातात आहे, अशा स्पष्ट इशारा त्यांनी बेजाबदार नागरिकांना दिला आहे. मास्कचा वापर केला पाहिजे. कोरोनाचा धोका कायम आहे, त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

Read More