Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू

कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू

कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू झाला आहे. संबधित व्यक्ती 15 तारखेला कोरोना संशयित म्हणून सीपीआरमध्ये झाली होती. दाखल  मृत व्यक्तीचे स्वॅब टेस्टिंगसाठी पुण्याला पाठवले आहेत. त्याचा अहवाल आज येणार आहे. संशयित मृत व्यक्तीने 8 मार्च ते 15 मार्च दरम्यान हरियाणा, दिल्ली, मुंबई, पुणे, आणि कोल्हापूर असा टॅक्सीने प्रवास केला होता. मृत व्यक्ती मूळची हरियाणामधील राहणारी होती. पण कामानिमित्त हातकणंगले तालुक्यातील नागाव इथं वास्तव्यास होती.

हरियाणा, दिल्ली, पुणे असा प्रवास करून कोल्हापुरात परतलेल्या हातकणंगलेतल्या नागाव इथल्या एका ६८ वर्षीय कोरोना संशयित वृद्धाचा सीपीआरमधील कोरोना कक्षात मृत्यू झालाय. त्यामुळे जिल्ह्यासह राज्याचा आरोग्य विभाग हादरून गेलाय. संबंधित रुग्णाचे स्वॅब पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविण्यात आलेत. त्याचा तपासणी अहवाल आज आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकणारेय.

मृत व्यक्ती ही मूळची हरियाणामधली असून एका उद्योगात कामावर असल्यानं त्याचं वास्तव्य कोल्हापूर जवळच्या नागाव फाटा इथं होतं. ही वृद्ध व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही असं सीपीआरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील यांनी सांगितलंय. मृत पावलेल्या व्यक्तीचा स्वॅब तपासणी अहवाल आज सायंकाळपर्यंत जिल्हा आरोग्य यंत्रणेस प्राप्त होईल.

संशयित कोरोनासदृश ६८ वर्षीय व्यक्ती ८ मार्च रोजी कामानिमित्त कोल्हापूर ते पुण्याहून दिल्लीमार्गे हरियाणाला गेली. त्यानंतर ही व्यक्ती पुन्हा हरियाणा, दिल्ली, पुणे या मार्गे १२ मार्चला कोल्हापुरात परतली. संशयित कोरोनासदृश व्यक्तीचा प्रवास टॅक्सीमधून झाल्याची माहिती समोर आलीय. 

रुग्णांची संख्या ३२ वर 

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३२ वर गेली आहे. केईएममध्ये बुधवारपासून नवी मशिन आणि सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे तिथे देखील रुगण चाचणीची क्षमता वाढणार आहे. १५ ते २० दिवसांच्या आत नवी लॅब सुविधा, प्रशिक्षण पुरवण्यात येणार आहे. महिन्याभरात मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबाद इथे लॅब उभारण्यात येणार आहेत. सेव्हन हिल्समध्ये ४०० बेड्स तयार करण्यात आले आहेत. एमपीएससी परीक्षा ३० मार्चनंतर घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

पंतप्रधनांची घोषणा 

सार्क देशांमध्ये यासंदर्भातीस १५०० प्रकरणे समोर आली आहेत. एकमेकांच्या सहाय्याने याच्याशी लढण्यास सोपे जाईल असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले. कोरोनाशी लढण्यासाठी सार्क देशांतकडून निधी उभारला जाईल. या निधीमध्ये १ कोटी डॉलर इतका निधी भारतातर्फे दिला जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. यातून उपकरणे खरेदी केली जातील असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

Read More