Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

तर शिवसेनेमध्ये या! मनोहर जोशींची काँग्रेसच्या या नेत्याला ऑफर

काँग्रेसमध्ये जमत नसेल तर शिवसेनेत या

तर शिवसेनेमध्ये या! मनोहर जोशींची काँग्रेसच्या या नेत्याला ऑफर

पुणे : काँग्रेसमध्ये जमत नसेल तर शिवसेनेत या असं शिवसेना ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी अमित देशमुखांना आमंत्रण दिलंय. पुणे मनपाच्या राजीव गांधी 3 डी तारांगणाचं उदघाटन मंगळवारी झालं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

काँग्रेसमध्ये काही मिळवायचं असेल तर नुसत्या शुभेच्छा देऊन चालत नाहीत तर त्यासाठी प्रार्थना करावी लागते असं यावेळी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख म्हणाले. त्यांच्या भाषणाचा धागा पकडत मनोहर जोशींनी त्यांना मार्मिक सल्ला दिला.

Read More