Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

धक्कादायक, दिवाळीची खरेदी करू न दिल्याने तरुणीची आत्महत्या

दिवाळीसाठी कपडे खरेदी करावयाचे होते. मात्र, कपड्यांवरुन मतभेद झालेत आणि तिने आत्महत्या केली.

धक्कादायक, दिवाळीची खरेदी करू न दिल्याने तरुणीची आत्महत्या

नागपूर : धक्कादायक बातमी नागपूरमधून. दिवाळीची खरेदी करू न दिल्याने एका २० वर्षांच्या कॉलेज तरुणीनं गळफास लावून आत्महत्या केली. दिवाळीसाठी कपडे खरेदी करावयाचे होते. मात्र, कपड्यांवरुन मतभेद झालेत आणि तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

पायल करडभाजने असं मृत तरुणीचं नाव आहे. पायल वसंत नगरमध्ये राहात होती. पायल महाविद्यालयात शिकत होती. तिला एक लहान बहीण आणि लहान भाऊ आहे. तिचे वडील शेतकरी आहेत. मंगळवारी दुपारच्या सुमाराला पायलनं घरी गळफास लावून आत्महत्या केली. 

दिवाळीच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या कपडे खरेदीवरून तिचे कुटुंबियांशी मतभेद झाले होते, त्यामुळेच तिनं आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. आत्महत्येपूर्वी पल्लवीने कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Read More