Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Cold wave | राज्यात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम; पिकांनाही फटका

Cold wave in maharashtra : उत्तर महाराष्ट्र थंडीनं गारठला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडचा पारा 4.4 अंश सेल्सिअस इतकं खाली गेला आहे.

Cold wave | राज्यात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम; पिकांनाही फटका

नाशिक : उत्तर महाराष्ट्र थंडीनं गारठला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडचा पारा 4.4 अंश सेल्सिअस इतकं खाली गेला आहे. निफाडच्या कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात या हंगामातील सर्वात नीचांकी 4.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. ही थंडी हरभरा, गहू पिकांना लाभदायक आहे. मात्र, या थंडीमुळे द्राक्ष आणि कांद्याला फटका बसणार आहे. द्राक्ष बागांच्या मण्यांना तडे जात असल्याने थंडीपासून बचाव करण्याकरिता द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या पेटवून द्राक्ष वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. तर काही ठिकाणी जनावरांना ऊब देण्यासाठी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.

धुळे
धुळे जिल्ह्यात 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर नंदुरबारमधील डोंगररांगांमध्ये 6 अंशापर्यंत तापमान नोंदवलं गेलं आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शीतलहरीचा तडाखा कायम आहे. त्यामुळे, नागरिकांच्या जनजीवनावर मोठा परिणाम पहायला मिळत आहे. 

नाशिक
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात वाढलेले तापमान पुन्हा एकदा आज कमी झाले आहे. आज तापमानाचा पारा पुन्हा सात अंशावर आले आहे. गुरुवार आणि शुक्रवार हे तापमान दहा अंश याच्यावर होते. ग्रामीण भागात निफाड ओझर परिसरात हाच पारा 5 अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिककर थंडीचा अनुभव घेतायत

नागपूर
नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीचा कडाका कायम आहे. नागपुरात आज पारा 7.6 अंश सेल्सिअसवर गेला आहे. 
तर गोंदिया 7.4 अंश सेल्सिअस तापमान आहे. संपूर्ण विदर्भात सर्वात थंड वातावरण आहे. 

वाशिम
वाशिम जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अचानक थंडीचा कडाका चांगलाचं वाढला आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा 9ते10अंशापर्यंत घसरल्यामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे, नागरिक उबदार कपडे घालून घराबाहेर पडत आहेत. तर, थंडीमुळे ग्रामीण भागातील नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. थंडीमुळे आजारपणाचा धोका वाढला आहे.

भंडारा गोंदिया
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडका वाढला आहे. भंडारा जिल्ह्याचं तापमान 7 अंश सेल्सिअस असून, गोंदियाचं किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअस इतकं  नोंदविण्यात आलं आहे. वाढत्या थंडीमुळे सर्दी,खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

परभणी
परभणी जिल्ह्यात थंडीचा पारा चांगलाचं घसरलांय..सध्या 5.6 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरलांय..जिल्ह्यात थंड वारे वाहू लागल्याने हुडहुडी भरलीयं..अनेक ठिकाणी नागरिक थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटीचा वापर करतांयत..ही थंडी हरभरा, गहू या पिकांसाठी लाभदायक आहे..

Read More