Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आचारसंहिता : निवडणूक काळात दारूविक्रीत अचानक वाढ झाली तर...

निवडणूक काळात दारूविक्रीवर आयोगाची करडी नजर असणार आहे. दारुच्या विक्रीत वाढ झाली तरी चौकशी होणार आहे.  

आचारसंहिता : निवडणूक काळात दारूविक्रीत अचानक वाढ झाली तर...

रायगड : निवडणूक काळात दारूविक्रीवर आयोगाची करडी नजर असणार आहे. दारुच्या विक्रीत अचानक वाढ झाली तरी चौकशी होणार आहे. त्यामुळे दारु दुकानदारांवर कारवाईची टांगती तलवाल असणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात दारु विक्रीवर आपोआप लगाम बसणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात जर एखाद्या दारूच्‍या दुकानातील दारूविक्रीमध्‍ये अचानक वाढ झाली तर त्‍या दुकानाच्‍या मालकामागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. विक्री वाढल्‍याची कारणे द्यावी लागणार आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन करताना दारू दुकानातील मद्यसाठा दररोज तपासला जाणार आहे. यात काही काळबेरे आढळले तर मालकाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

रायगड जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात व्यापक कारवाई सुरु करण्याचे निर्देश पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहेत. जे दुकानदार नियमित वेळेपेक्षा अधिक काळ दारू विक्री करतील त्यांचे परवाने रद्द केले जाणार असल्याची माहिती रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

Read More