Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'सरकार आणण्यात शरद पवारांचा चमत्कार'

आधी आम्ही सत्तेत अर्धवट होतो. त्यामुळे निर्णय घेताना बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात

'सरकार आणण्यात शरद पवारांचा चमत्कार'

पुणे : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा बक्षिस समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयोजित होते. या कार्यक्रमाच्या भाषणावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपला टोळा लगावला आहे. तसेच हे सरकार आणण्यात शरद पवारांचा चमत्कार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं आहे. 

शिवसेना-भाजप युती असताना आताच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना कमी जागा देण्यात आली. असं असताना देखील कमी आमदार असूनही आम्ही करून दाखवलं, म्हटतं शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं राजकारण गाजत असताना मुख्यमंत्र्यांनी 'शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा' असल्याचं म्हटलं आहे. शेतकरी हा कर्जमुक्त होणारचं असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. सहकार, राजकारण वेगळं करू शकत नाही. 

कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याबाबत च संशोधन इथे केलं जातं, पवार साहेबांना कमी जागांत सरकार बनवलं, त्यामुळे कोणाला जास्त जागा असं म्हणून चालणार नाही. ऊस शेती करताना लोकांच्या आयुष्याच चिपाड होत, याकडे राज्यकर्ते म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही, असे देखील ते यावेळी म्हणाले. 

आधी आम्ही सत्तेत अर्धवट होतो. त्यामुळे निर्णय घेताना बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात होता, त्याला फोडणी कोण देणार? फडणवीस सरकारला टोला लगावत मुख्यमंत्री म्हणाले. मी या पदावर नवीन आहे. मला इथे सगळेचजण समजून घेत आहेत. हर्षवर्धन पाटील देखील मला अनेक गोष्टी समजावून सांगतात असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. 

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा पारितोषक वितरण समारंभ सुरू आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अजित पवार, बाळासाहेब थोरात आदी नेते याप्रसंगी उपस्थित होते.

Read More