Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Chiplun flood : गावकऱ्यांनी धाडस दाखवत केली 15 जणांची सुटका, खेर्डीत 20 जणांना वाचविले

Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. (Heavy rains in Chiplun) हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. 

Chiplun flood : गावकऱ्यांनी धाडस दाखवत केली 15 जणांची सुटका, खेर्डीत 20 जणांना वाचविले

मुंबई / चिपळूण :  Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. (Heavy rains in Chiplun) हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. चिपळूणमध्ये जागोजागी एनडीआरएफचं बचावकार्य सुरू आहे. काल रात्री खेर्डी इथे अडकलेल्या 20 जणांना वाचवण्यात आले आहे. पथकाने विविध भागातल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रात्रभर प्रयत्न केले. रात्रभर बचावकार्य सुरू होते. तर कळंबस्ते परिसरात जिथे वाशिष्ठी नदीचा प्रवाह भयंकर आहे तिथे रात्रीपासून 15 माणसे घराच्या छतावर अडकली होती. त्यांना नागरिकांनी धाडस दाखवून सुखरुप बाहेर काढले. (Heavy rains in Chiplun, Maharashtra )

गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती भयानक झाली आहे. चिपळूणला महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण पाण्याने वेढले गेले आहे. हजारो लोक पुरात अडकले असून एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. कळंबस्ते येथे अडकलेल्या लोकांशी कुणाचाही संपर्क होत नव्हता. छतावर अडकलेल्या 15 जणांची रात्रीच्या सुमारास गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप सुटका केली आहे. गावकऱ्यांनी रस्सीच्या मदतीने इथल्या लोकांना बाहेर काढल्यात आले आहे. 

अत्यावश्यक सेवेसाठी संपर्क क्रमांक

 1)  चिपळूण तहसीलदार - 02355 295004

2) उपविभागीय अधिकारी चिपळूण - 02355 252046

3) चिपळूण नगरपरिषद -  02355 261047

4) चिपळूण पोलीस ठाणे  - 02355 252333

5) पोलीस नियंत्रण कक्ष - 02352 222222

6)जिल्हा नियंत्रण कक्ष - 02355 226248

 चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये  हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. येथील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात झाला आहे. त्यामुळे दुसरा दिवसही अंधारात काढवा लागला आहे. पुराचे पाणी अजूनही पाणी कमी झालेले नाही. दरम्यान, NDRF चे बचावकार्य सुरू झाले आहे. (NDRF rescue operation started in Chiplun) संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आले आहे. विदर्भातल्या अमरावतीत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra flood)

fallbacks

Read More