Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Chinchwad Bypolls results : कसबा निसटला पण चिंचवड कायम ठेवलं; अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय

Chinchwad Bypolls results 2023 : गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरु असलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी भाजपने केली होती. मात्र महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याने ही निवडणूक अटीतटीची झाली होती

Chinchwad Bypolls results : कसबा निसटला पण चिंचवड कायम ठेवलं; अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय

Chinchwad Bypolls results 2023 : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (laxman jagtap) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा (Chinchwad Bypolls) निकाल अखेर जाहीर झाला आहे. लक्ष्मण जगपात यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (ashwini jagtap) यांनी या चुरसीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने इथल्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अश्विनी जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे (nana kate) तर अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे (rahul kalate) हे मैदानात होते. या तिरंगी लढतीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी मोठा विजय मिळवला आहे. भाजप महाराष्ट्रने यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. अश्विनी जगताप यांचा 36,091 मतांनी मोठा विजय झाला आहे.

गेल्या महिन्याभरापासूनच या निवडणुकीची चुरस पाहायला मिळत होती. मात्र त्याआधीपासून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन भाजपकडून करण्यात आलं होतं. मात्र, मविआनं नाना काटेंना उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक झाली. तर दुसरीकडे शिवसेनेतून बंडखोरी करत राहुल कलाटे यांनीही या निवडणुकीत उडी घेतली होती. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही कलाटे यांच्याविरोधत जोरदार टीका करत नाना काटेंना विजयी करण्याचे आवाहन केले होते. मात्र भाजपच्या अश्विनी जगताप यांचा अखेर विजय झाला आहे.

अंतिम आकडेवारी

अश्विनी जगताप – 1,35,434
नाना काटे – 99,343
राहुल कलाटे – 44,082

निकालाआधीच विजयाचे बॅनर

चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळे गुरव परिसरात विजयाचे बॅनर लावण्यात आले होते. यावर अश्विनी जगताप यांचा आमदार असा उल्लेख करण्यात आला आहे.

Read More