Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अंबरनाथमध्ये राडा! आमदार बालाजी किणीकर आणि महिला शिवसैनिक आमनेसामने

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरुद्ध महिला शिवसैनिकांची घोषणाबाजी

अंबरनाथमध्ये राडा! आमदार बालाजी किणीकर आणि महिला शिवसैनिक आमनेसामने

चंद्रशेखर भूयार, झी मीडिया, अंबरनाथ : अंबरनाथ मतदार संघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये आज अंबरनाथ नगर पालिकेत बाचाबाची झाली. यावेळी महिला शिवसैनिकांनी आमदारांविरोधात घोषणाबाजीही केली. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिका मुख्यालयात एकच गोंधळ उडाला होता. 

शहरातील प्रश्न घेऊन पालिकेत आले असताना आमदार दुसऱ्या सभागृहात पत्रकार परिषद कसे घेऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित करत महिलांनी त्यांना विरोध केला. तर आपण समस्यांबाबत मला कळवले नाही, मीही आलो असतो, असं डॉ. किणीकर घोषणाबाजी करणाऱ्या महिला शिवसैनिकांना म्हणाले. 

पत्रकार परिषद संपवून आमदार डॉ. किणीकर सभागृहाबाहेर येताच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सदस्यांनी त्यांना गराडा घातला. आम्ही शहरातील समस्या घेऊन पालिकेत असताना आपण पत्रकार परिषद घेता, असा सवाल महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यावरही महिला कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. 

तुम्ही आमच्या मतांवर आपण निवडून आलेले आहात. आपण इकडे वेगळा गट करून आलात, असेही काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांना सुनावलं. त्यावर आम्ही शिवसैनिक आहोत वेगळा गट नाही, असं सांगत डॉ. किणीकर पालिका मुख्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. किणीकर यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली

यावर आम्हाला कुणी निवडून आणलं हे सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे जे लोक म्हणतायत की दगडाला शेंदूर फासून आमदार केलं ते बालिश आहेत अशी प्रतिक्रिया आमदार बालाजी किणीकर यांनी दिली.

Read More