Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

तळोधी जगंलात वाघिणी मृतावस्थेत

चंद्रपूर जिल्ह्यात  वाघ मृत्यूचे सत्र सुरुच आहे. ताज्या घटनेत एका वाघीणीचा मृत्यू झाला आहे.

 तळोधी जगंलात वाघिणी मृतावस्थेत

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात  वाघ मृत्यूचे सत्र सुरुच आहे. ताज्या घटनेत एका वाघीणीचा मृत्यू झाला आहे.

ब्रम्हपुरी वनक्षेत्रात असलेल्या तळोधी जंगलातल्या गंगासागर हेटी परिसरातील कक्ष क्र. 90 RF येथे ही वाघीण मृतावस्थेत आढळली. 

सावरगाव वन डेपोत रवाना 

 वनविभागाच्या पेट्रोलिंग दरम्यान ही वाघीण आढळल्यावर तातडीने वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.

हा भाग वनविभागाच्या तळोधी प्रादेशिक जंगलाचा भाग आहे. संध्याकाळ झाल्याने या वाघिणीला लगतच्या सावरगाव वन डेपोत रवाना केले गेले. 

खरे कारण ?

सकाळी मृत वाघिणीचे शवविच्छेदन केल्यावर मृत्यूचे खरे कारण कळणार आहे. 

वाघ मृत्यूची दुसरी घटना 

 २०१८ वर्षात वाघ मृत्यूची ही दुसरी घटना असून ११ दिवसांपूर्वी सिंदेवाही जंगलातील मेंढामाल जंगलात वाघाचा मृत्यू झाला होता. 

Read More