Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

राणेंचा विषय माझ्या आवाक्याबाहेरचा- चंद्रकांत पाटील

 महसूल मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर सूचक वक्तव्य केले आहे.

राणेंचा विषय माझ्या आवाक्याबाहेरचा- चंद्रकांत पाटील

पुणे : 'स्वाभीमान'चे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. महसूल मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर सूचक वक्तव्य केले आहे.  राणेंचा विषय इतका मोठा आहे की तो माझ्या ताकदीच्या बाहेरचा विषय आहे. त्याबाबतचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा समर्थ आहेत असे ते म्हणाले. यावर अधिक प्रतिक्रीया देणे चंद्रकांत पाटील यांनी टाळले. 

जो जो पक्षात येईल त्या सगळ्याचं स्वागतच आहे. फक्त त्यांचावर कुठले गंभीर गु्न्हे दाखल नसावेत, आरोप नसावेत, त्यांना कुठला शब्द दिला जाणार नाहीयुतीच्या जागावाटपाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे घेतील असे पाटील म्हणाले.

मी दिल्लीत खासदार, निलेश आणि नितेश विधानसभा लढवणार- राणे

ज्यांची चर्चा आहे ते सगळे १ सप्टेबंरला भाजपात येणार आहेत. त्यांचे स्वागत आहे. त्यांचे राजीनामे वगैरे अशा तांत्रिक बाबी लक्षात घेऊन त्यांचे प्रवेश होतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उदनराजे भोसले यांची भाजपात येण्याची इच्छा असेल आणि त्यांना पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा अशी उदयनराजेंची इच्छा असेल तीदेखील पूर्ण होईल. शेवटी ते राजे असल्याचे ते म्हणाले.

बारा दिवस बारापर्यंत ध्वनिक्षेपक 

यावर्षी सातव्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे भाविकांना गणेशोत्सवात ६ दिवस रात्री १२ पर्यंत देखावे बघता येणार आहेत. यापूर्वी ४ दिवसच देखावे सुरु ठेवता येत होते.

यावेळी त्यांनी डॉल्बीविषयी भाष्य केले. डॉल्बीला विरोध नाही मात्र त्याची आवाज मर्यादा ओलाडायला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विसर्जनादिवशी रात्री १२ नंतर वाद्य वाजवायला परवानगी देता येणार नाही. न्यायालयाच्या निर्णय पाळावाच लागेल असेही ते म्हणाले. 

Read More