Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

चोरटयांनी कॉलेज तरुणीची सोनसाखळी हिसकावून नेली

सर्व प्रकार cctv मध्ये चित्रित

चोरटयांनी कॉलेज तरुणीची सोनसाखळी हिसकावून नेली

उल्हासनगर : दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी कॉलेजच्या तरुणीची सोनसाखळी हिसकावून नेल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. हा सर्व प्रकार cctv मध्ये चित्रित झाला आहे. कॅम्प नंबर ३ च्या विठ्ठलवाडी स्टेशन रोड परिसरात दिवसा  ढवळ्या हा सगळा प्रकार घडला आहे. वेदांत कॉलेजमधील एसवाय.बीकॉमची विद्यार्थिनी सकाळीच्या सुमारास कॉलेज संपून आपल्या दोन मैत्रिणींसोबत घरी निघाली होती. याच वेळी मागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने या विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून धूम ठोकली.

या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान आता या cctv च्या मदतीने पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. हा सर्व प्रकार रस्त्याशेजारी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे.

Read More