Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पीक कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक कर्मचारी निलंबीत

 फरार राजेश हिवसे याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी व्यक्त केलाय

पीक कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक कर्मचारी निलंबीत

बुलढाणा: पीककर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्याचं अखेर निलंबन करण्यात आलंय. या प्रकरणातला दुसरा आरोपी शिपाई मनोज चव्हाण याला मूर्तीजापूरमध्ये अटक करण्यात आली. शाखाधिकारी राजेश हिवसे मात्र अद्याप फरार आहे. दाताळा इथल्या बँकेच्या शाखेत घडलेल्या या प्रकरानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी दिरंगाईनं कारवाई होत असल्याचा आरोप झाल्यानंतर जिल्हा प्रशासनानं अखेर शाखाधिकारी आणि शिपायाचं निलंबन केलं आहे.

फरार आरोपीला लवकरच अटक करणार - पोलीस

दरम्यान, फरार राजेश हिवसे याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी व्यक्त केलाय. तर निलंबनानंतर आता दोघांवर अधिक कठोर कारवाई होईल आणि प्रकरण जलद न्यायालयात हाताळण्यात येईल, असं आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. निरुपम डांगे यांनी दिलंय. 

सेंट्रल बँकेच्या शाखेला काळं फसलं

पीक कर्ज मंजूर करुन देण्यासाठी शेतक-याच्‍या पत्‍नीकडे शरीरसुखाची मागणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यानं केली होती. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण यांच्याविरुद्ध याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. या घटनेवर आता तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या घटनेच्या निषेधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सेंट्रल बँकेच्या शाखेला काळं फसण्यात आलं. तर ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रेदशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

Read More