Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

वसईत CBI ची धाड; नोकरीच्या बहाण्याने भारतीय नागरिकांना रशिया युक्रेन युद्धात पाठवले

परदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली भारतीय नागरिकांना रशिया युद्धात पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वसईत सीबीआयने छापेमारी केली. 

वसईत CBI ची धाड; नोकरीच्या बहाण्याने  भारतीय नागरिकांना रशिया युक्रेन युद्धात पाठवले

Vasai Crime News : परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 35 भारतीय नागरिकांना रशिया युक्रेन युद्धभूमीत पाठवणाऱ्या नेटवर्कचा सीबीआयने पर्दाफाश केला. यानंतर त्याचे धागेदोरे वसईत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात वसईच्या हाती मोहोल्ला परिसरात सीबीआयने छापेमारी केली आहे.

या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार फैसल खान उर्फ बाबा, सुफियान दारुगर आणि पूजा दारूगर हे वसईच्या गौलवाडी परिसरात राहणारे आहेत. गुरुवारी सीबीआयने गौलवाडी परिसरातील पूजा आणि सुफियान या दामपत्याच्या घरी धाड टाकून चौकशी केली आहे. तब्बल सहा तास ही चौकशी सुरू होती.

या प्रकरणात भारतीय तरुणांची फसवणूक करणाऱ्या फैसल उर्फ बाबा याने एका व्हिडीओद्वारे भारत सरकारकडे रशियामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करावी अशी मागणी केली आहे. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल करा कारवाई करा, मात्र अडकलेल्या नागरिकांची सुटका करा, अशी मागणी भारत सरकारकडे केली आहे.

सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने शुक्रवारी आणि शनिवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत सोलापूर तुळजापूर रोडवर एका बोलेरो वाहनातून वाहतूक होणारी बाराशे लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. तसेच विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून साडेनऊ लाखांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने या विशेष मोहिमेत एकूण 11 गुन्ह्यात लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

डोळ्यात मिर्ची पूड टाकून व्यापाऱ्याला लुटले

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सदोबा सावळी येथील सराफा व्यापारी विशाल लोळगे यांचे वाहनाच्या काचा फोडून त्यांच्यावर मिरची पावडर फेकत व पिस्तुलाचा धाक दाखवीत लुटणार्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या गुन्ह्यातील पाचपैकी चार चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून चोरी केलेला 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्यांनी विना क्रमांकाचे वाहन चोरी करण्यासाठी वापरले होते. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे तपास करून शेख अफसर शेख शारीक यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दिलेल्या कबुली नुसार त्याचे इतर साथीदार फैय्याज खान बिसमिल्ला खान, शेख निसार शेख उस्मान, शेख जमीर शेख फेमोद्दीन, शाकीब खॉ आणि अय्युब खाँ यांच्या सहभागाची माहिती दिली.  

 

Read More