Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नववधुची लग्नमंडपात बुलेटवरून एन्ट्री

नववधुची बुलेट एन्ट्री

नववधुची लग्नमंडपात बुलेटवरून एन्ट्री

मुंबई : आपला लग्न सोहळा हटके व्हावा असं प्रत्येकालाच वाटतं असतं. भिवंडी तालुक्यातील आमणे गावातील प्रणाली विश्वजित केणे या २२ वर्षीय नवरीनेही आपला लग्नसोहळा हटके व्हावा यासाठी खास करवल्यांसह बुलेटवरून लग्नमंडपात एन्ट्री घेतली. नववधूने अशी बुलेटवरून एन्ट्री घेतल्यामुळे नवरदेवासह व-हाडी मंडळी अवाक झाली. तसंच नवरीचा बुलेटवरून एन्ट्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

त्यामुळे ठाणे जिल्ह्यात याच लग्नाचा विषय चर्चिला जात आहे. प्रणाली शालेय शिक्षण घेत असल्यापासून दुचाकी चालवतेय..कल्याण इथे महाविद्यालयात शिकत असतानाही ती बुलेटवरच जायची.ही बुलेट प्रणालीला  तिचा भाऊ विशालने रक्षा बंधनाची भेट म्हणून दिली आहे. प्रणाली हिचे लग्न कोपरी इथल्या योगेश संदीप भोईर या इंजिनियर तरुणाशी धुमधडाक्यात पार पडलं. लग्नाची वेळ ६ वाजून २० मिनिटांनी होता.भटजीने मंगलाष्टकांना सुरुवात केली. वऱ्हाडींसह पै - पाहुण्यांच्या नजरा नवरीच्या आगमनाकडे वळल्या मात्र यावेळी प्रणाली हिने पती योगेश याच्यासह वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी बुलेटवरून नववधू प्रणालीने एंट्री घेतली आहे. 

प्रणालीच्या या बुलेट एन्ट्रीने सैराट सिनेमातल्या आर्चीची अर्थात रिंकू राजगुरुची आठवण पुन्हा एकदा करून दिली.

Read More