Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बुलडाण्यात एटीएम कार्डच्या माध्यमातून नागरिकांना लूटणारी टोळी गजाआड

बँक एटीएम कार्ड क्लोन करुन नागरिकांना लूटण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.

बुलडाण्यात एटीएम कार्डच्या माध्यमातून नागरिकांना लूटणारी टोळी गजाआड

बुलडाणा : बँक एटीएम कार्ड क्लोन करुन नागरिकांना लूटण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना बुलडाणा जिल्ह्यात देखील घडली आहे. बँक एटीएम कार्ड क्लोन पैसे चोरी करणाऱ्य़ा टोळीला पोलिकांनी तुरुंगात टाकलं आहे.

बँक ग्राहकांचा डाटा चोरून त्या आधारे बनावटी क्लोन ATM कार्ड तयार करून हे चोरी करत असत. या घटना बुलढाणा शहरात दिवसेंदिवस वाढत होत्या. जिल्ह्यातील ATM डाटा चोरीचे गुन्हे लक्षात घेता त्यावर नियंत्रण घालण्यासाठी दिनांक ९ सप्टेंबर रोजी शेगांव शहरमधील सिद्ध वियानाक लॉजवर पोलिसांनी अचानक छापा टाकला.

या लॉजवर अनेक दिवसापासून दुसऱ्या राज्यातील लोक राहत होते. या खोलीची पोलिसांनी झडती घेतली. या झडतीत पोलिसांना HP कंपनीचा लॅपटॉप, एक मोठे डेफ्टन स्कॅनर, दोन लहान डेप्टन स्कॅनर, चार्जर, दोन डाटा केबल, VIP ATM कार्ड ११ नग, क्लोन बनावट केलेले ६ ATM कार्ड, ४ मोबाईल, आणि १५,५१० रूपये मिळाले आहे.  

एकूण १,३३,२१५ रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात सापडलेले आरोपी अनिल धर्मवीर, वय २९ (रोहनात गाव हरियाणा), रोहीत पृथ्वीसिंग, वय ३२ (रोहछम, हरियाणा), संजय बियासिंग वय २८ (पाहिगाव, हरियाणा) असे आहेत.

सध्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांनी कसून चौकशी सुरु आहे. 

Read More