Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अर्थसंकल्पाचे पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कितपत परिणाम? जाणून घ्या आजच्या किमती

Petrol Diesel Price Today : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहे. मात्र या अर्थसंकल्पापूर्वी महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त झाले की महाग ते जाणून घ्या... 

अर्थसंकल्पाचे पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कितपत परिणाम? जाणून घ्या आजच्या किमती

Petrol Diesel Rate (1st Feb 2024) : आज, 1 फेब्रुवारीला देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पानुसार या वर्षी देखील अर्थसंकल्पात अनेक गोष्टी मांडल्या जाऊ शकतात. मागच्या काही काळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे तेल कंपन्यांचे लक्ष बजेटकडे अधिक लक्ष लागले आहे. अशातच रोजप्रमाणे देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या जातात. 

आज आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाने प्रति बॅरल $80 पेक्षा जास्त आहे. ब्रेंट क्रूड मार्च फ्युचर्स 0.57% वाढून $82.87 प्रति बॅरल होते. त्याच वेळी, WTI साठी मार्च फ्युचर्स प्रति बॅरल $78.08 वर पोहोचले आहेत. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान क्रूडची किंमत 130 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली होती, त्यानंतरही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या नाहीत. मुंबई आणि पुण्यातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाणून घ्या.

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर 

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

ठाण्यात पेट्रोल रुपये 105.74 आणि डिझेल 92.25 रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोल 105.54 रुपये आणि डिझेल 93.04 रुपये प्रति लिटर

नाशिकमध्ये पेट्रोल 106.12 रुपये आणि डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर

हे सुद्धा वाचा: काय स्वस्त होणार आणि काय महाग? आज सादर होणार देशाचा अर्थसंकल्प 

नागपूरमध्ये पेट्रोल 106.21 रुपये आणि डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर

कोल्हापूरमध्ये पेट्रोल 105.51 रुपये आणि डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर 

देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात आणि त्यानंतर लोकांना पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमतींची माहिती मिळते. महागडे उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पेट्रोल आणि डिझेल पोहोचेपर्यंत त्यांचे दर मूळ किमतीपेक्षा अधिक होतात. 

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारे मिळवू शकता. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249  या नंबर पाठवावा लागेल.

एका क्लिकवर जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर

तुमच्या मोबाईलवर इंडियन ऑइल वन मोबाईल ॲप डाउनलोड करून, तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर इंधनाचे दर तपासू शकता. इंडियन ऑइलच्या https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx या वेबसाइटवर पेट्रोल डिझेलची किंमत पाहता येईल. 

Read More