Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बाबासाहेबांना भारतरत्न देण्यास विलंब कुणी लावला? काँग्रेससोबतची शिवसेना नकली! राज्यातील पहिल्याच सभेत बरसले PM मोदी

चंद्रपुर येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला कारल्याची उपमा दिली. त्यासाठी त्यांनी मराठीतली म्हणही सर्वांना बोलून दाखवली.. 

बाबासाहेबांना भारतरत्न देण्यास विलंब कुणी लावला? काँग्रेससोबतची शिवसेना नकली! राज्यातील पहिल्याच सभेत बरसले PM मोदी

PM Modi In Chandrapur : भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा चंद्रपुरात घेतली. या प्रचार सभेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार घेतला. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. 

मोदींनी चंद्रपुरात आज काँग्रेसला कारल्याची उपमा दिली. त्यासाठी त्यांनी मराठीतली म्हणही सर्वांना बोलून दाखवली.  मोदींनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे सरकार राज्याचे हिताचे काम करत आहेत. 

राम मंदिर निर्माण कार्याला काँग्रेसनेच विरोध केला. काँग्रेस पक्षामुळे डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना भारतरत्न मिळण्यास विलंब झाला?  काँग्रेसने फक्त कमिशन खाण्याचे काम केले असे अनेक गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  2024 लोकसभेची निवडणूक ही स्थिरते विरुद्ध अस्थिरतेविरोधात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी मध्ये भाषणाची सुरवात केली. 
  • ही निवडणूक स्थिरता विरुद्ध अस्थिरता अशी आहे
  • एका बाजूला भाजप ज्यांचं ध्येय देशासाठी महत्त्वाचे निर्णय घेणे तर दुसरीकडे इंडिया आघाडीचा मंत्र आहे जिथं सत्ता मिळेल तिथं भरपूर मलई खावं
  • इंडिया आघाडीने देशाला अस्थिरतेकडे झोकलं आहे. 
  • स्थिर सरकार का आवश्यक असते हे महाराष्ट्रापेक्षा अधिक कुणाला माहीत
  • जेव्हा राज्यात जनादेश झुगारून इंडिया आघाडीवाले महाराष्ट्रात सत्तेत आले तेव्हा राज्यांपेक्षा स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार केला
  • कुठलं कंत्राट कुणाला मिळावं हे ठरविण्यात ते मश्गुल होते
  • कमिशन लाओ नहीं तो काम पर ब्रेक लगाओ असा त्यांचा मंत्र होता. 
  • जलयुक्त शिवार योजना त्यांनीच बंद पाडलं, विदर्भासाठीच्या योजना यांनी बंद केल्या, वॉटरग्रीड, रिफायनरी, समृद्धी महामार्ग, पंतप्रधान घरकुल योजना यांनीच बंद पाडल्या
  • आमच्या सरकारने या सगळ्या योजना पुन्हा सुरू केल्या
  • शिंदे फडणवीस पवारांचं सरकार रात्रंदिन काम करतंय
  • लोक मोदी सरकारला आपलं सरकार मानतात
  • मोदी गरीब परिवारात जन्माला येऊन देशाचा प्रधानमंत्री झाला आहे
  • देशाचं विभाजन कुणी केलं ? काश्मीरचा प्रश्न कुणी प्रलंबित ठेवला ? लाल आतंकवाद कुणामुळे ? बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कारापासून वंचित ठेवलं ? 
  • महाराष्ट्रातच नाही तर देशभरात नक्षलवाद कमजोर पडला आहे
  • गडचिरोली पोलादाचं शहर म्हणून ओळखला जाते

 

Read More