Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

भाजपाला का हवा आहे हा युवा मातब्बर नेता?

वंचित बहुजन आघाडीचे फायरब्रँड नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा

भाजपाला का हवा आहे हा युवा मातब्बर नेता?

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : बहुजन वंचित आघाडीला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. धनगर समाजाचे मातब्बर नेते गोपीचंद पडळकर भाजपाच्या संपर्कात आहेत. भाजपा त्यांना जत किंवा खानापूरमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीचे फायरब्रँड नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल बदलवून टाकला होता. हेच पडळकर आता भाजपाच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. गोपीचंद पडळकर हे भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. 

कारण पडळकर यांना लोकसभा निवडणुकीत ३ लाख २३४ मतं मिळाली होती. यात जत विधानसभा मतदारसंघात ५३ हजार ८३ एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. तर  खानापूरमध्ये ७८ हजार २४ एवढी मतं मिळाली होती. 

जतमध्ये विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्याविरोधात नाराजी आहे. शिवाय पडळकर यांना मानणाऱ्या धनगर मतदारांची संख्या या मतदारसंघात जास्त आहे. युती झाली तर जतचा पर्याय पडळकरांसाठी दिला जाऊ शकतो किंवा युती झाली नाही तर शेजारच्या खानापूर मतदारसंघातून पडळकरांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

मात्र दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी गोपीचंद पडळकर वंचितसोबतच असल्याचा दावा केला आहे.

पडळकरांचा धनगर समाजात चांगला जनाधार आहे. येत्या काळात जानकर रुसले तरी पडळकरांच्या रुपानं पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा नेता भाजपाला मिळणार आहे. पडळकर यांच्या प्रवेशानं भाजपाची ताकद वाढणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाला मोठा धक्का बसणार आहे.

Read More