Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शरीर शिंदेंसोबत तर आत्मा ठाकरे गटासोबत; गजानन कीर्तिकर यांबद्दल हे काय बोलले भाजप आमदार अमित साटम

मुंबईतील ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांवर ईडी आणि सीबीआयचा दबाव असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. उमेदवारी घेऊ नका, दुस-या बाजूने लढा असं कीर्तिकरांना भाजपकडून सांगितलं जातंय असा आरोप राऊतांनी केला.

शरीर शिंदेंसोबत तर आत्मा ठाकरे गटासोबत; गजानन कीर्तिकर यांबद्दल हे काय बोलले भाजप आमदार अमित साटम

Gajanan Kirtikar : महायुतीमध्ये एकीकडे जागावाटपावरुन वाद विवाद सुरु आहे. अशातच आता नेत्यांमध्ये सुरु असलेली अंतगर्त धुसपूस महायुतीसाठी डोकेदुखी ठरु शकते. शिंदे गटाचे आमदार  गजानन कीर्तिकर यांच्यावर भाजप आमदार अमित साटम यांनी जहरी टीका केली आहे. शरीर शिंदेंसोबत तर आत्मा ठाकरे गटासोबत असल्याचा टोला भाजप आमदार अमित साटम  यांनी गजानन कीर्तिकर यांना लगावला आहे. 

खासदार गजानन कीर्तिकरांमुळे शिवसेना-भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपा आमदार अमित साटम यांची कीर्तिकरांवर सडकून टीका केली आहे.  शरीर शिंदेंसोबत तर कीर्तिकरांचा आत्मा ठाकरे गटासोबत असल्याची टीका केली आहे. 
आमदार साटम यांनी कीर्तीकरांवर  घोटाळ्याचा आरोप केला होता. गजानन कीर्तिकरांमुळे साटम यांची गोची  झाली होती.  साटम आणि कीर्तिकर वादामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.  

इडी चौकशी थांबवावी - गजानन कीर्तिकर

कथित खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही...हे ईडीचे अधिकारीसुद्धा खासगीत कबूल करत आहेत असा दावा गजानन कीर्तिकरांनी केलाय...जो कंपनीला काही नफा झाला त्याचा मोबदला सर्वांना धनादेशाद्वारे देण्यात आला...त्यामुळे घोटाळा वगैरे काही झालेलं नसल्याचं सांगत कीर्तिकरांनी मुलगा अमोल कीर्तिकरांची बाजू घेतली...मात्र, असं असलं तरी मी मुलाविरोधातच प्रचार करणार अशी ठाम भूमिका कीर्तिकरांनी घेतलीय...

उत्तर पश्चिम मुंबईत रवींद्र वायकर शिंदे गटाचे उमेदवार

गजानन कीर्तिकर याचे काम करणार नाही अशी भूमिका रवींद्र वायकर घेतली आहे. शिंदे गटातही अंतर्गत वाद सुरु आहे.  उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर उमेदवार असण्याची शक्यता आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गुरूवारी वर्षावर बैठक झाली. या बैठकीत वायकरांना लोकसभेसाठी तयारी करा असं सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. येत्या दोन दिवसांत याबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते. त्यामुळं शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाकडून वायकर असा सामना होण्याची शक्यता आहे. याआधी उत्तर पश्चिम मुंबईतून गोविंदा, सचिन खेडेकर, सचिन पिळगांवकर यांचीही नावे पुढं आली होती.  जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून रविंद्र वायकर तीन वेळा आमदार म्हणून निवडुन आलेत. त्याआधी ते सलग चारवेळा नगरसेवक म्हणून देखील निवडुन आलेत. रविंद्र वायकर मुंबई महापालिकेचे सलग चार वर्षे स्थायी समिती अध्यक्षही होते.

 

Read More