Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

एमआयएम नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या भाजपा नगरसेवकांना अटक

 मारहाणप्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे. 

एमआयएम नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या भाजपा नगरसेवकांना अटक

औरंगाबाद : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यावरुन औरंगाबाद पालिका सभागृहात झालेल्या मारहाणप्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे. मारहाण झालेला एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन यानं याबाबत तक्रार केली होती. सभागृहात अमानुष मारहाण झाल्याचं त्यानं तक्रारीत नमूद केलं होतं. याच तक्रारीवरुन भाजप गटनेते प्रमोद राठोड, उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक राजगौरव वानखेडे, माधुरी अदवंत आणि रामेश्वर भादवेंविरोधात गुन्हा दाखल झालाय. या पाचही नगरसेवकांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.

पोलीस सज्ज 

याच गुन्ह्यात या सगळ्यांना अटक होण्याची शक्यता आहे. एमआयएमच्या मतीनला अटक झाली मात्र भाजप नगरसेवकांना का नाही यावरुन चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या या नगरसेवकांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. सध्या तरी लोकांना याबाबत माहिती मिळाली नाही. पण ही बातमी पसरताच मोठी गर्दी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 

Read More