Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

BJP bandh Violence : अमरावतीत जमाव बंदीचे आदेश जारी

Amravati BJP bandh Violence : त्रिपुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपकडून बंद पुकारण्यात आला होता. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले आहे.

BJP bandh Violence : अमरावतीत जमाव बंदीचे आदेश जारी

अमरावती : Amravati BJP bandh Violence : त्रिपुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपकडून बंद पुकारण्यात आला होता. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले आहे. दगडफेक आणि तोडफोड जमावाकडून करण्यात आल्याने हिंसाचार उफाळला. त्यामुळे  अमरावती शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. 

समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई - गृहमंत्री

महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी ही दंगल घडवणू आणली आहे. दंगली घडवणं हा भाजपचा हातखंडा आहे. राज्य चालवता येत नाही म्हणून भाजपकडून दंगली घडविण्यात येत आहे, असा थेट आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

भाजप बंदला येथे हिंसक वळण, आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण लागले आणि आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड करण्यात आली. राजकमल चौकात आंदोलकांकडून दगडफेकही करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज करण्यात आला.

अमरावतीतल्या बंददरम्यान, आंदोलकांकडून 4 -5 दुकानांची जाळपोळ करण्यात आली. दुकानं बंद केली नाहीत म्हणून दुकानं जाळली गेलीत. बंद पाळायला काही दुकानदार तयार नव्हते. त्यांच्यावर दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. त्यानंतर दुकानांची तोडफोड करण्यात आली.

Read More