Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मोठी बातमी| आंबेनळी घाट आज वाहतुकीसाठी बंद

महाबळेश्वर ते पोलादपूर आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद

मोठी बातमी| आंबेनळी घाट आज वाहतुकीसाठी बंद

तुषार तपासे, झी 24 तास, सातारा :  महाबळेश्वर ते पोलादपूर आंबेनळी घाट रस्ता हा दुरुस्ती कामामुळे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते, घाट, पूल याचं मोठं नुकसान झालं. दरडी कोसळून मोरी आणि पुलांचे मोठे नुकसान झालं होतं.

 या सर्व ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यामुळे प्रतापगड कुंभरोशी तापोळा अहिर रस्ता तसेच पार कमान ते देवळी रस्ता आज सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्याही वाहतुकीस दुरुस्तीच्या अनुषंगाने बंद ठेवण्यात येणार आहे. 

आंबेनळी घाटातून जर कुठे जाण्याचा विचार असेल तर तुम्हा मार्ग बदलावा लागेला. कारण दुरुस्तीच्या कामासाठी हा घाट आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

Read More