Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : राष्ट्रवादीकडून ३ नावं चर्चेत

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, तसंच त्यांच्या घरातलं इतर कोणीही इच्छूक नाही.

भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : राष्ट्रवादीकडून ३ नावं चर्चेत

भंडारा : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक लढवायला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, तसंच त्यांच्या घरातलं इतर कोणीही इच्छूक नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या पोटनिवडणुकीसाठी विजय शिवणकर, नाना पंचबुद्धे आणि माजी आमदार मधुकर कुकडे, या ३ जणांची नावं राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. उद्या सकाळपर्यंत यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. सर्वसहमतीनं उमेदवाराचं नाव निश्चित करण्यासाठी आज रात्री राष्ट्रवादीचे नेते स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. 

दरम्यान भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे, माजी आमदार आणि विद्यमान गोंदिया जिल्हा भाजप अध्यक्ष हेमंत पटले यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 10 मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 

Read More