Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

वाशिम येथून भावना गवळी यांची उमेदवारी धोक्यात? व्हायरल पत्रामुळे खळबळ

भावना गवळी यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. वाशिम मतदार संघात भावना गवळी यांच्याविरोधात नकारात्मक वातावरण निर्माणा झाले आहे. 

वाशिम येथून भावना गवळी यांची उमेदवारी धोक्यात? व्हायरल पत्रामुळे खळबळ

Bhavana Gawali : शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांची लोकसभेची उमेदवारी धोक्यात आली आहे. भावना गवळी यांच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रामुळे वाशिम मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे. भावना गवळी यांच्या उमेरवारीला विरोध करणारे हे पत्र आहे.  शिवसेनेच्या जागावाटपाची यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची  शक्यता आहे. यामुळे आता या यादीत भावना गवळी यांचे नाव येते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांना उमेदवारी दिल्यास त्यांना मतदान करणार नाही अशा आशयाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे हे पत्र लिहिलेले आहे. वाशिम मतदारसंघात भाजपचा मतदार आहे. लव्ह जिहाद, गो हत्या, धर्मांतरण विरोधासाठी आम्ही आंदोलन करीत असताना तुमचा लोकप्रतिनिधी त्यालाच बळी पडला आहे. तुम्ही बाईसाहेबांना उमेदवारी देऊ नका, दिली तर आम्ही पक्षनिष्ठ असलो तरी दुसरा पर्याय निवडू, इथली विकासकामे लोकप्रतिनिधीच्या हप्तेवसुलीमुळे रखडली आहे. आमच्या भावनांचा अनादर केला तर तर आम्ही मते देण्याची बिलकुल भावना ठेवणार नाही, त्यामुळे या मतदार संघात भाजपचा उमेदवार असल्यास उत्तम पण आयात केलेला माल नसावा अशी मागणी असलेले हे पत्र व्हायरल होत नसल्याने भावना गवळी यांच्या उमेदवारीवरून पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.

भावना गवळी यांच्या जागी कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार

जलासंधारण कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांची भेट घेतलीय. राठोड यांनी आपल्याला राज्यात ठेवण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केल्याची माहिती सुत्रानं दिलीय. यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी यांच्या ऐवजी राठोड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, राठोड लोकसभा लढण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तसी इच्छा बोलून दाखवल्याची माहिती सुत्रानं दिलीय. राठोड यांना उमेदवारी दिल्यास महायुतीत अधिक फायदा होईल, असा एक अहवाल समोर येतोय. त्यामुळे राठोड यांच्यावर लोकसभा लढवण्यासाठी दबाव असल्याचं बोललं जातंय.

शिवसेनेच्या जागावाटपाची यादी संध्याकाळपर्यंत जाहीर होणार

शिवसेनेच्या जागावाटपाची यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची  शक्यता आहे.. ठाण्यातील मुख्यमत्र्यांच्या घरी  शिवसेना लोकसभा गट नेते आणि खासदार राहुल शेवाळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली.. या बैठकीला खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने, भावना गवळी, धैर्यशिल माने, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे देखील उपस्थित होते... लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांची यादी पुढील २४ तासात जाहीर होणार असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.

 

Read More