Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

MBBS च्या विद्यार्थ्याला लुटले; अंगावर कपडेही ठेवले नाही... कारण काय तर

Baramati News: बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (medical college) विद्यार्थ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

MBBS च्या विद्यार्थ्याला लुटले; अंगावर कपडेही ठेवले नाही... कारण काय तर

जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती: सध्या सगळीकडेच लूटमारीची अनेक प्रकरण समोर येताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार बारामतीत घडलेला पाहायला मिळाला आहे. या प्रकरणामुळे सध्या सगळीकडेच एकच खळबळ माजली आहे. बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (medical college) विद्यार्थ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मोटर सायकलवरून आलेल्या तीन अज्ञातांनी विद्यार्थ्याच्या खिशातील 15 हजार रुपयांची रक्कम (robbed) लुटली. तसेच त्या विद्यार्थ्यांला आडबाजूला नेहुन त्याला नग्न करून त्याचे नग्नावस्थेत (naked) चित्रीकरण केल्याचे देखील तक्रारीत म्हटलं आहे. 4 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान MBBS च्या दृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बारामती येथील सुभद्रा मॉलमधून खरेदी करून मेडिकल कॉलेजच्या होस्टेल कडे जात असताना अज्ञात इसमानी विद्यार्थ्यांला वाटेत थांबवले आणि त्याच्या खिशातून बळजबरीने 15 हजार रक्कम काढून घेतली. (Baramati MBBS Student Stripped Naked and Robbed Crime News Maharashtra)

त्यानंतर त्या विद्यार्थ्यांला गाडीवर बसून उसाच्या शेतात नेले आणि त्याला मारहाण केली तसेच त्याला नग्न करून चित्रीकरण केल्याचे त्यानं तक्रारीत म्हटलं आहे. मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्यांला एटीएम मध्ये आणले आणि त्याच्या खात्यातील 15 हजार रक्कम अज्ञात इसमानी काढून घेतली आणि पोबारा केला. त्यावरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांन धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद केला आहे. बारामती तालुका पोलिसांनी भां द वी 394, 397, 504, 506 कलम अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. 

ज्वेलर्सवरील घातला दरोडा

द्वारली गावात भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स हे सोने-चांदीचे (gold sliver) विक्रीचे दुकान आहे, काल सकाळी दुकान उघडतात काही वेळातच एक चार चाकी वाहनातून आलेले चार ते पाच दरोडेखोर दुकानात घुसले, त्यांनी बंदूक आणि तीक्ष्णहत्यांचा धाक दाखवत दागिने लुटण्याचा प्रयत्न केला, यावेळी मालक गोपाळ कुमावत आणि त्यांच्या दोन नोकरांनी प्रतिकार केला मात्र त्यांच्यावर हल्ला करून  दरोडेखोर दागिने घेऊन पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाला आहे. पोलिसांनी दरोडेखोरांना शोधण्यासाठी चार पथक रवाना केली आहेत.  

डोळ्यात लाल मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न 

दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी इसमांनी सोनाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुकानातील सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केलाय. मात्र दुकान मालकाने आरडाओरडा केल्याने आरोपींनी तो दागिन्यांचा बॉक्स दुकाना बाहेर टाकून पळ काढण्याची घटना पनवेल शहरात घडलेय. मुस्तकीम नुरुल  तरफदार यांच्या एम . एम . ज्वेलर्स या दुकानात दोन अनोळखी इसम ग्राहक बनून आले व सोन्याचे दागिने पहात असताना अचानकपणे  एका इसमाने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुकानातील सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्न केला. दुकान मालकाने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग केल्याने आरोपींनी दागिन्यांचा बॉक्स दुकाना बाहेर टाकून पळ काढला. 

Read More