Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

स्कूलबस थेट दुकानात घुसली । अपघात सीसीटीव्ही कैद

चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बदलापूरात एका खासगी शाळेची बस थेट दुकानात घुसली. 

स्कूलबस थेट दुकानात घुसली । अपघात सीसीटीव्ही कैद

ठाणे : चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बदलापूरात एका खासगी शाळेची बस थेट दुकानात घुसली. बदलापूर पश्चिमेतील गणेश चौक भागात झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातादरम्यान बस चालक उडी मारून फरार झाला. घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण होते. ही बस दुकानात शिरतांनाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे.

एक भरधाव बस दीड वाजण्याच्या सुमाराच्या उताराने निष्काळजीपणे दुकानात घुसली. दरम्यान, याचवेळी रिक्षातून शाळेची मुले उतरत होती. सुदैवाने ही खासगी बस थेट दुकानाच्या दिशेने गेली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या खासगी बसवर बदली चालका होता. त्यामुळे त्याला बस चालविता येत नसल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे प्रशिक्षित चालक असल्याची खात्री करुन शाळेने अशा बस सुरु ठेवाव्यात, अशी मागणी पालक वर्गातून करण्यात येत आहे.

Read More