Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अंबरनाथमध्ये सीएनजी पंपावर रिक्षामध्ये स्फोट

रिक्षामध्ये गॅस भरत असताना हा स्फोट 

अंबरनाथमध्ये सीएनजी पंपावर रिक्षामध्ये स्फोट

ठाणे : अंबरनाथमध्ये सीएनजी पंपावर रिक्षामध्ये स्फोट झाला आहे. रिक्षामध्ये गॅस भरत असताना हा स्फोट झाला. या स्फोटात रिक्षा जळून खाक झाली आहे. अंबरनाथमधील फॉरेस्ट नाका परिसरातील महानगर गॅस पंपावर हा स्फोट झाला. सुदैवानं या स्फोटात कोणीही जखमी झालं नसून कोणतीही जीवतहानी झालेली नाही.

देशात सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण त्यासोबतच या रिक्षांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. गॅस भरत असताना जास्त गॅस भरल्यामुळे स्फोट होण्याच्या अनेक घटना आतापर्यंत पुढे आल्या आहेत. 

Read More