Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

धक्कादायक, औरंगाबादचा कचरा चक्क 'टाऊन हॉल' या ऐतिहासिक वास्तूत

 कचरा समस्या सोडण्यासाठी औरंगाबद महापालिकेने धक्कादायक उपाय शोधलाय आहे 

धक्कादायक, औरंगाबादचा कचरा चक्क 'टाऊन हॉल' या  ऐतिहासिक वास्तूत

औरंगाबाद : शहातील कचरा समस्या सोडण्यासाठी महापालिकेने धक्कादायक उपाय शोधलाय आहे. हा उपाय पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ही कल्पना कोणाच्या सुपिक डोक्यातून आली याचीच चर्चा सुरु आहे. शहरातील टाऊन हॉल या ऐतिहासिक वास्तुमध्ये पालिकेने कचरा लपवलाय. पालिकेच्या या अजब कारभारामुळे अनेकांना धक्का बसलाय. याची पोलखोल झी २४ तासने केलेय.

टाऊन हॉल या ऐतिहासिक जागेचं संगोपन व्हावं नव्या पिढीला इतिहास कळावा म्हणून इथे एक कला दालनही उभारण्यात आलं होतं. पण सद्या ही ऐतिहासिक वास्तू कचऱ्याचे आगार बनलीय. या वास्तुलाच लागून आहे बॅडमिंटन हॉल. पण तोही कचऱ्याचं आगार बनलाय.  

या दोन्ही ठिकाणी शहरातील कचरा महापालिकेनं या ठिकाणी लपवून ठेवला आहे. पण असा कचरा लपवून कचरा प्रश्न सुटणार आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. असं करून पालिका नेमकी कुणाच्या डोळ्यात धुळफेक करतेय. असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यानस औरंगाबादमधील टाऊन हॉल एक ऐतिहासिक वास्तू आहे. या जागेच संगोपन करायचे टाकून हे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.

Read More