Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शिवसेना राज्यमंत्री समर्थक नगराध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञाताकडून दगडफेक झाली. या दगडफेकीत गाडीची मागची काच फुटली. सालगांवकर हे दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक आहेत. 

शिवसेना राज्यमंत्री समर्थक नगराध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

सिंधुदुर्ग : सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञाताकडून दगडफेक झाली. या दगडफेकीत गाडीची मागची काच फुटली. सालगांवकर हे दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक आहेत. 

त्यांच्या गाडीवर कोणी हल्ला केला याबाबतच माहिती मिळू शकली नाही. पालिकेच्या विशेष बैठकीत सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातून या कृत्याचा जाहीर निषेध  करण्यात आला. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. 

Read More