Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Sharad Pawar : ST कर्मचारी आक्रमक, शरद पवारांच्या निवासस्थानी घुसून आंदोलन

एसटी कर्मचारी ( ST Workers ) अचानक आक्रमक झाले आहेत.

Sharad Pawar : ST कर्मचारी आक्रमक, शरद पवारांच्या निवासस्थानी घुसून आंदोलन

मुंबई : न्यायालयाच्या निर्णयानंतर काल सायंकाळी आझाद मैदानात जल्लोष करणारे एसटी कर्मचारी ( ST Workers ) अचानक आक्रमक झाले आहेत. 

या आक्रमक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ( NCP CHIEF SHARAD PAWAR ) यांच्या 'सिल्वर ओक' ( Silver Oak ) या निवासस्थानी गराडा घातला आहे. हे आंदोलक शरद पवार यांच्या विरोधात घोषणा देत आहेत. 

एसटी विलीनीकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अडथळा आणला, असा आरोप करत एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी निदर्शने केली. 

या आंदोलकांनी शरद पवार यांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक करण्यात येत आहे. हे आंदोलक अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी सिल्वर ओकला चारही बाजूने घेरले आहे. 

 

पोलिसांनी काही आंदोलकांना तब्यत घेतले आहे. तर, पोलीस आणि कर्मचारी यांच्यात वाद हलताना दिसत आहे. या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सामील झाल्या असून त्याच या आंदोलनात आघाडीवर आहेत.

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. काल न्यायालयाच्या निर्णयानंतर आझाद मैदानात असलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा केला होता. मात्र, त्यानंतर अचानक कर्मचाऱ्यांनी आज हे आंदोलन केले. 

Read More