Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

ATS ची मोठी कारवाई, पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक

 पुणे दहशतवादी विरोधी (ATS) पथकानं मोठी कारवाई करत पुण्यातून एका संशियत दहशतवाद्याला अटक केली आहे.    

ATS ची मोठी कारवाई,  पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक

सागर आव्हाड झी 24 तास पुणे  : पुणे दहशतवादी विरोधी (ATS) पथकानं मोठी कारवाई करत पुण्यातून एका संशियत दहशतवाद्याला अटक केली आहे. जुनेद मोहम्मद असं या तरूणाचं नाव आहे. टेरर फंडिग प्रकरणी त्याला अटक करण्यात आलीय. त्याच्या अटकेनं पुण्यात खळबळ उडाली आहे. (ats anti terrorism squad arrests junaid mohammad man on charges of terror funding)

पुण्यातील दहशतवाद विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे.  जम्मू काश्मीरमधील एका अतिरेकी संघटनेच्या संपर्कात असल्यानं एका तरुणाला पोलिसांनी दापोडी परिसरातून अटक केली. जुनेद मोहम्मद असं या 28 वर्षीय संशयित तरुणाचं नाव आहे. काश्मीर मधील अतिरेकी संघटनेकडून जुनेदला फंडींग झाल्याचा आरोप आहे. त्यामुळं पुण्यात खळबळ उडालीय.

कोण आहे हा संशयित दहशतवादी? 

राज्यातील तरुणांना लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत भरती करण्याचा जुनेदचा प्लॅन होता असा आरोप आहे. तो जम्मू काश्मीरमधील प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए- तोएबाच्या सक्रिय सभासदांच्या संपर्कात होता.

त्यांच्या मदतीनं वेगवेगळ्या राज्यातील तरुणांना दहशतवादाचं प्रशिक्षण देण्याकरता जम्मू काश्मीर इथं नेण्याचा प्रयत्न तो करत होता. या कामाकरता जम्मू काश्मीरमधून त्याच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचा आरोप आहे. याशिवाय सोशल मीडियात चिथावणीखोर पोस्ट टाकून धार्मिक तेढ निर्माण केल्याचाही आरोप जुनैदवर आहे. 

अटक करण्यात आलेला जुनैद मूळचा बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचं शिक्षण मदरशात झालंय. राज्याच्या अनेक भागात त्यानं रेकी केल्याचा संशय आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एटीएसचं पथक त्याला जम्मू-काश्मीरमध्ये घेऊन जाणाराय. त्याच्या अटकेनं पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मोठी खळबळ उडालीय.

जुनैदच्या अटकेनं आता अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. त्याला नेमके कुणी पैसे पाठवले? या पैशांचं तो काय करणार होता? त्याच्या संपर्कात कोण कोण होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं हेच मोठं आव्हान आता पुणे ATSसमोर असणारंय.

Read More