Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अकोल्यामध्ये ढगाळ वातावरणात मतदानाला सुरुवात

अकोल्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. 

अकोल्यामध्ये ढगाळ वातावरणात मतदानाला सुरुवात

जयेश जगड,झी मीडिया, अकोला : अकोल्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात आज सकाळी सात वाजतापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघात एकूण 68 उमेदवार रिंगणात आहेत.  यामध्ये अकोला पश्चिम, अकोला पूर्व, बाळापुर, अकोट आणि मुर्तीजापूर या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघाचा समावेश आहे. 

अकोला जिल्ह्यातिल पाचही मतदारसंघातून एकूण १५ लाख ७७ हजार १५४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ८ लाख १२ हजार १८१ आहेयेत. तर महिला मतदारांची संख्या ७ लाख ६१ हजार ८६४ एवढी आहेय...तर एकूण मतदान केंद्रांची संख्या १७०३ आहेय..मतदान निर्भीडपणे पार पडावा या करीता सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.. 

मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या

१) अकोट - एकूण मतदार संख्या २,८५,५८९ येथे प्रमुख उमेदवार भाजपचे आमदार आणि उमेदवार प्रकाश भारसाकळे, वंचित बहुजन आघाडीचे ऍड.संतोष राहाटे, काँग्रेसचे संजय बोडखे तर शिवसेना बंडखोर अनिल गावंडे मैदानात आहेय.

२) बाळापूर - मतदार संघात एकूण २,९५,४११ मतदार आहेय ..इथे वंचित बहुजन आघाडीचे प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, राष्ट्रवादीचे संग्राम गावंडे, MIM चे डॉ.रेहमान खान आणि शिवसेनेचे नितीन देशमुख निवडणुकीच्या मैदानात आहेत ... 

३) अकोला पश्चिम - या मतदारसंघात एकूण ३,३१.४५६ मतदार आहेत...प्रमुख उमेदवार म्हणून भाजप आमदार आणि उमेदवार गोवर्धन शर्मा , वंचित बहुजन आघाडीचे मदन भरगड , काँग्रेसचे साजिद खान पठाण रिंगणात आहेत.

४) अकोला पूर्व - सर्वाधिक मतदार असलेला हा मतदारसंघ असून एकूण ३,४४,०१५ मतदार आहेत. येथे प्रमुख उमेदवार म्हणून भाजपचे आमदार आणि उमेदवार रणधीर सावरकर, वंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे आणि काँग्रेसचे विवेक पारसकर प्रमुख लढतीत आहेत .. 

५) मूर्तिजापूर - एकमेव राखीव मतदारसंघात एकूण ३,२०,७८३ मतदार आहेत ..येथे प्रमुख उमेदवार म्हणून भाजप आमदार आणि उमेदवार हरिष पिंपळे ,पाचही मतदार संघातून एकमेव महिला उमेदवार वंचित बहुजन आघाडी तर्फे प्रतिभा अवचार , भाजपचे बंडखोर राजकुमार नाचणे ,राष्ट्रवादीचे रवी राठी मैदानात आहेत.

Read More