Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

भुजबळ जेव्हा युतीच्या उमेदवाराला 'ऑल द बेस्ट' म्हणतात...

भुजबळ इगतपुरी मतदार संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी इथं दाखल झाले होते

भुजबळ जेव्हा युतीच्या उमेदवाराला 'ऑल द बेस्ट' म्हणतात...

नाशिक : विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घमासान सुरू आहे. इगतपुरी मतदार संघाच्या युतीच्या उमेदवार निर्मला गावित यांनी गुरुवारी छगन भुजबळ यांना पाया पडून नमस्कार केला. त्यावेळी छगन भुजबळांनी 'ऑल द बेस्ट' म्हणत गावितांना शुभेच्छा दिल्या. उल्लेखनीय म्हणजे, यावेळी भुजबळ इगतपुरी मतदार संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी इथं दाखल झाले होते. 

यावर, निर्मला गावित यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता 'आपल्यात ज्येष्ठांना नमस्कार केला जातो. भुजबळ ज्येष्ठ असल्यानं मीही त्यांना नमस्कार केला' असं उत्तर निर्मला गावित यांनी दिलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या निर्मला गावित यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. त्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते माणिकराव गावित यांच्या सुपुत्री आहेत.

भुजबळांकडून आदित्य ठाकरेंना शुभेच्छा

तर, छगन भुजबळ यांनी या निमित्तानंच निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या ठाकरे कुटुंबातील पहिल्या-वहिला व्यक्तीला अर्थात उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाही शुभेच्छा दिल्या. 'ठाकरे घराण्याने आजपर्यंत अनेक जणांना नगरसेवक - महापौर बनविले... त्यात मीही होतो... पण बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे कधीच रिंगणात उतरले नव्हते. आज आदित्य ठाकरे यांच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक तरुण नेता पुढे येतोय. आदित्य ठाकरे यांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून शुभेच्छा' असं म्हणत ठाकरे घराण्याशी असलेल्या जुन्या संबंधांना भुजबळांनी पुन्हा एकदा उजाळा दिल्या. परंतु, यावेळी राज्यात आघाडीचंच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी, आदित्य ठाकरेंची यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची संपत्ती ११ कोटी ३८ लाखांवर त्यांची संपत्ती आहे. १० कोटी ३६ लाखाच्या बॅंक ठेवी, २० लाख ३९ हजारांचे बॉन्ड शेअर, बीएमडब्ल्यू कार (६ लाख ५०हजार), ६४ लाख ६५ हजाराचे दागिने तसेच १० लाख २२ हजार अशी रक्कम त्यांच्या नावावर आहे.

Read More