Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अश्विनीच्या शरीराचे तुकडे पिशवीत भरले, आरोपीची कबुली

माजी पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात धक्कादायक गोष्ट समोर आलीये. आरोपींनी हत्येची कबुली दिलीये. 

अश्विनीच्या शरीराचे तुकडे पिशवीत भरले, आरोपीची कबुली

नवी मुंबई : माजी पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात धक्कादायक गोष्ट समोर आलीये. आरोपींनी हत्येची कबुली दिलीये. 

अश्विनी यांच्या शरीराचे तुकडे करून पिशवीत भरून खाडीत टाकून देण्यात आले. आरोपींनी खळबळजनक कबुली दिलीये. आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फळणीकरला अजून एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलीये. 

मात्र आरोपीकडून अद्याप हत्यार हस्तगत करण्यात आलं नाही. या हत्ये प्रकरणी यापूर्वीच निलंबित पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक करण्यात आली आहे. 

Read More