Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलिसाला चिरडलं

पोलीस कारवाईदरम्यान घडली घटना 

जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलिसाला चिरडलं

चंद्रपूर : नागपूर- चंद्रपूर येथील महामार्गावर एक भीषण घटना घडली असून यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावर असणाऱ्या खांबाडा चेकपोस्ट येथे हा अपघात झाला असून, जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलिसाला चिरडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

जनावरांची तस्करी करणाऱ्या एका वाहनाविषयीची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते वाहन अडवण्यासाठीच्या कारवाईदरम्यान ही घटना घडली. भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने बॅरिगेट्सना धडक देत पोलिस अधिकाऱ्यांनाही चिरडलं. ज्यामध्ये प्रकाश मेश्राम या पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून, ते दोघंही कामठी या गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

 

Read More