Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या घटनांत ५ वारकऱ्यांचा मृत्यू

पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या घटनांत ५ वारकऱ्यांचा मृत्यू

सातारा: तरडगाव ते फलटण माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना तीन भाविकांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. कलुबा तुळशीराम सोलने (वय ६५ रा. सिंदखेड राजा जि. बुलडाणा) व सुभाष चंद्रभान गायकवाड (वय ५५ रा. मुकुंदवाडी ता. जि. औरंगाबाद) व अन्य एक अशा तीन भाविकांचा पायी चालत असताना  हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने शोककळा पसरली असून माऊलींच्या पायी वारीत आलेल्या या मृत्यूमुळे अनेक भाविकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

ट्रकखाली चिरडून वारकऱ्याचा जागीच मृत्यू

इंदापूर तालुक्यातील अंथूर्णे येथे पालखी सोहळ्यात चाललेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून संजय मुकिंदा कांबळे (वय-५० ,रा.अंथूर्णे ता.इंदापूर) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. नाऊलीची पालखी तरडगाव मुक्कामी असताना दर्शन घेऊन परत येताना रस्ता क्रॉस करताना रस्त्यामधील दुभाजकावर उभा असणाऱ्या कविता विशाल तोष्णीवाल रा. महाबळेश्वर यांना पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने ठार झाल्या.

लोणंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

महाबळेश्वर येथील विशाल तोष्णीवाल व त्यांचे कुंटुबिय श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी रात्री तरडगाव येथे गेले होते. रात्री साडे बारा वाजता माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी तळाजवळ लोणंद-फलटण रोड क्रॉस करण्यासाठी मध्यभागील डिव्हायडरवर थांबलेल्या होत्या. यावेळी कविता यांना लोणंदकडून फलटण जाणाऱ्या पाणी टँकर (क्र. एमएच १०- झेड-२७०८) ने जोरदार धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लोणंद पोलिस स्टेशनला टँकर चालक यशवंत पावले (वय 30 रा. पावलेवाडी ता. शिराळा जि. सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Read More