Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आनंदवारी: संत तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा आज इंदापूरमध्ये

तरडगावातील मुक्कामंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी फलटणहून बरडकडे मार्गस्थ झाली. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरड इथं असेल..

आनंदवारी: संत तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा आज इंदापूरमध्ये

इंदापूर: संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं रिंगण आज इंदापुरात पार पडणार आहे. कदम विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ११च्या सुमारास हा रिंगण सोहळा पार पडणार आहे. तुकोबांच्या पालखीचा मुक्काम आज (सोमवार, १६ जुलै) इंदापुरातच असणार आहे. तर माऊलींची पालखी आज फलटणहून बरडकडे मार्गस्थ झाली आहे. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरड इथंच असणार आहे.

ज्ञानोबा माऊलींची पालखीही मार्गस्थ

दरम्यान, महाराजांच्या पालखीच्या गोल रिंगण सोहळ्यात अबालवृद्ध वारकरी पताका, विणा, टाळ आणि मृदंघ घेऊन मोठ्या उत्साहात सहभागी होतात. महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळस घेऊन रिंगणस सोहळ्यात सहभाग घेतात. दरम्यान तरडगावातील मुक्कामंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी फलटणहून बरडकडे मार्गस्थ झाली. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरड इथं असेल... 

पालखी तळाचे होणार सुशोभिकरण

दरम्यान, राज्य शासनानने आता तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजने अंतर्गत पालखी तळ सुशोभिकरणाचं काम हाती घेतल आहे. भंडीशेगाव इथे घडीव आकर्षक दगडापासून भव्य असा पालखी तळ  बनव्यात येत आहे. दोन्ही पालखी तळाच्या प्रवेश ठिकाणी आकर्षक अशा स्वागत कमानी बनवण्यात आल्या आहेत. या दोन्ही पालखी तळाच्या स्वच्छतेचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं प्रांताधिकारी सचिन ढोल यांनी सांगितलंय. पालखी तळावर भाविकासाठी अतिरिक्त कायमस्वरूपी शौचालयाची उभारणीही करण्यात आली आहे.

Read More