Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आनंद परांजपेंच्या निवडणूक प्रचार चित्रफितीला परवानगी नाकारली

आनंद परांजपे यांना निवडणूक आयोगाचा धक्का

आनंद परांजपेंच्या निवडणूक प्रचार चित्रफितीला परवानगी नाकारली

ठाणे : ठाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या निवडणूक प्रचार चित्रफितीला परवानगी नाकारण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी सुपारी घेऊन काम करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. नरेंद्र मोदींसारखं कार्टून, निरव मोदी आणि विजय मल्ल्या यांचं छायाचित्र असल्यानेच ही परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने येत्या २४ तासात हस्तक्षेप करत न्याय द्यावा अन्यथा निवडणूक प्रचार बंद करु असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.

ठाण्यात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि शिवसेनेचे राजन विचारे यांच्यात थेट लढत असणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २००९ मध्ये मात्र शिवसेनेला येथे फटका बसला होता. पण २०१९ मध्ये येथे नाईक कुटुंबातून उमेदवार असेल अशी शक्यता होती. पण तसं झालं नाही. राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. आनंद परांजपे हे ठाण्यात राहत असले तरी त्यांच्यासाठी हा मतदारसंघ नवा आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने २ लाख ८५ हजार मतांनी विजय मिळवला होता. 

Read More