Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नवीन वर्षाचं स्वागत आणि एकच प्याला !

नवीन वर्षाच्या सेलेब्रेशनसाठी कॉकटेल आणि परदेशी मद्याला मोठीच मागणी आहे

नवीन वर्षाचं स्वागत आणि एकच प्याला !

मुंबई : नवीन वर्षाच्या सेलेब्रेशनसाठी कॉकटेल आणि परदेशी मद्याला मोठीच मागणी आहे

पर्यटकांची धूम

सध्या सर्वत्र ख्रिसमस आणि नवीन वर्षाची धूम आहे. यात वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये तसंच पर्यटन स्थळांवरही पर्यटकांची  प्रचंड गर्दी होतेय. या सेलेब्रेशनच्या मूडला मद्याची दिलखुलास जोड मिळतेय.

आवडते प्रकार

मद्यबाजारसुद्धा या उत्सवी वातावरणासाठी तयार झाला आहे. कॉकटेलला विशेष मागणी आहे त्याबरोबरच रम, व्होडका, कोनियाक ब्रॅँडी, डार्क रम, व्हाईट रम या प्रकारांनासुद्धा भरपूर मागणी आहे. उच्चभ्रूंच्या लाडक्या शॅम्पेनला खूप पसंती आहे. 

तरुणींना हवी वाईन

तरुणांना बिअर, बकार्डी, व्होडका हवी आहे तर तरुणींना व्होडकाचा समावेश असलेले कॉकटेल विशेष प्रिय आहेत. वेगवेगळ्या फ्रुटी वाईनसुद्धा तरुणींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.

उत्पादन शुल्क वाढलं

या सर्व वातावरणात मद्य विक्रीतून उत्पादन शुल्क विभागाची मात्र चांदी झाली आहे. कर रुपातून फार मोठं उत्पन्न या विभागाला मिळालं आहे. मद्यविक्रीवर निर्बंध असूनही विक्री मात्र वाढ झाली आहे.

Read More