Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारची भेट चर्चेत, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा!

एमसीए निवडणुकीसाठी शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर दिसणार.. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि अजित पवारांची भेट

पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारची भेट चर्चेत, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा!

Ajit pawar Eknath Shinde: मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात घडत असलेल्या घटनांमुळे गोंधळाची स्थिती पहायला मिळत आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या (Andheri Bypoll) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विनंतीमुळे अखेर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. (Ajit Pawar met Chief Minister Eknath Shinde at Varsha Bungalow marathi news)

अजित पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी (Varsha Bungalow) एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी भेट कशासाठी झाली?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. अजित पवार यांनी उद्धव ठाकरे गटाला सुनावल्यानंतर आता पवारांची शिंदे गटाशी वाढती जवळीक पाहता अनेक राजकीय तज्ज्ञांच्या भूवया देखील उंचावल्या आहेत.

अजित पवारांनी ठाकरे गटाला सुनावलं -

अंधेरी पोटनिवडणुकीतून अखेर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाने भाजपला चिमटे काढले होते. त्यावरून अजित पवार यांनी ठाकरे गटाला सुनावलं होतं.

आणखी वाचा - उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा, मशाल चिन्ह कायम

मुख्यमंत्र्यांचं ट्विट ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज वर्षा या निवासस्थानी माझी सदिच्छा भेट घेतली. राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, पुणे शहरात झालेली अतिवृष्टी यांसह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यावेळी त्यांनी दोघांच्या भेटीचा फोटो देखील शेअर केला आहे.

पाहा ट्विट -

दरम्यान, एमसीए निवडणुकीसाठी शरद पवार, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युतीची चर्चा तर नाही? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

Read More