Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Ajit Pawar Oath Ceremony: 2014 पासून तिसऱ्यांदा असं घडलं; विखे पाटलांनंतर अजितदादांनी उठवलं रान!

Ajit Pawar Deputy CM Oath Live: अचानक झालेल्या अजित पवारांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात तिसऱ्यांदा एक पराक्रम घडल्याचं पहायला मिळतंय.  

Ajit Pawar Oath Ceremony: 2014 पासून तिसऱ्यांदा असं घडलं; विखे पाटलांनंतर अजितदादांनी उठवलं रान!

Ajit Pawar Latest News: गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अशातच आता राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते अजित पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करत आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी केलेल्या या बंडामुळे आता अजित पवार यांनी राज्याच्या खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात तिसऱ्यांदा एक पराक्रम घडल्याचं पहायला मिळतंय.

विरोधी पक्षनेते सरकारमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आज एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. गेल्या दोन टर्ममध्ये तीन विरोधी पक्षनेते सरकारमध्ये सामील झाल्याचं दिसून येतंय. देवेंद्र फडणवीस यांच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील सहभाग झाले होते. त्यानंतर आता अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याचं दिसतंय.

कोणत्या नेत्यांनी घेतली शपथ

अजित पवार (उपमुख्यमंत्री) , छगन भुजबळ , दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे , धर्मा आत्रम, आदिती सुनील तटकरे , संजय बाबुराव बनसोडे

Read More