Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Maharastra News : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'या' सात खेळांचा समावेश

Ajit Pawar Annoucement : ‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कारासाठींच्या यादीत इक्वेस्टेरियन, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींगसह एरोबिक्स, ॲक्रोबॅटीकचा खेळांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे.

Maharastra News : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'या' सात खेळांचा समावेश

Shivachhatrapati State Sports Awards : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडाप्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावं तसंच जिम्नॅस्टिकमधील उपप्रकार असलेल्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत नव्यानं सामावेश करावा, असे निर्देश महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यंदाच्या (सन २०२२-२०२३) पुरस्कारांसाठी फेरसमाविष्ट केलेल्या क्रीडा प्रकारातील अर्ज ऑनलाईन पध्दतीनं तातडीनं मागवून ते सुद्धा विचारात घ्यावेत, अशा सूचना दिल्या.

कोणताही खेळाडू तो खेळत असलेल्या क्रीडा प्रकारात यश मिळवण्यासाठी त्याची उमेदीची वर्षे खर्च करतो. आपलं सर्वस्व पणाला लावतो. आपल्या कौशल्य, मेहनतीच्या बळावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यासह देशाचं नाव उज्ज्वल करतो. अशा खेळाडूंच्या क्रीडा कामगिरीचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं शिवछत्रपती पुरस्कार देण्यात येतात, त्यामुळे कुठल्याही खेळावर आणि खेळाडूंवर अन्याय होऊन चालणार नाही. या दृष्टीकोनातून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी पात्र असलेल्या ४४ खेळांपैकी वगळण्यात आलेल्या इक्वेस्टेरियन, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर व यॉटींग या सात खेळांना पुन्हा यादीत सामावून घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

जिम्नॅस्टिक खेळामधील उपप्रकार असणाऱ्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या पात्र यादीत नव्यानं सामावेश करण्याचं ठरवण्यात आलं. सन २०२२-२३ या वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. त्यांची मुदत २२ जानेवारीपर्यंतच होती. ही मुदत वाढवून या नव्यानं समाविष्ट केलेल्या खेळांसाठीचे अर्ज ऑनलाईन मागवण्याच्या सूचना दिल्या.

अजित पवार म्हणतात...

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोणताही खेळाडू तो खेळत असलेल्या क्रीडा प्रकारात यश मिळविण्यासाठी त्याची उमेदीची वर्षे खर्च करतो, आपले सर्वस्वपणाला लावतो. आपल्या कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल करतो. अशा खेळाडूंच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने शिवछत्रपती पुरस्कार देण्यात यावा, असं अजित पवार म्हणतात.

Read More